१८व्या लोकसभेचं संसदीय अधिवेशन २४ जून पासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात संविधानाच्या प्रती हातात घेत आंदोलन केलं. तसंच लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी देखील काँग्रेसने घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.