पुण्यातील अमली पदार्थ प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं आहे. शहरात अशा गंभीर घटना घडताना पालकमंत्र्यांना जाब विचारला जात आहे. अशातच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आपण पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत या विधानामुळे नवा वाद रंगला आहे. त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.