ओम बिर्ला यांची आज लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूळ (ओरिजनल) संस्थापक असा उल्लेख केला. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी देखील ओरिजनल राष्ट्रावादी या शब्दावर भर दिला. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? या वादाचा अंक आज संसदेतही पाहायला मिळाला.