सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्याविरोधात आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या या भूमिकेवर बोलताना सगे सोयऱ्यांची व्याख्या समजावून सांगितली.