महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण, ओबीसी आणि मराठा समाजातील वाद, परीक्षेतील गोंधळ, पुण्यातील पोर्शे अपघात, ड्रग्ज आदी प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील राजकारणही तापलं आहे. त्यामुळे विधानसभेसह विधान परिषदेतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.