विधानसभेचं पावसाळी अधिवेश आजपासून सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते. अशातच उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनातील लिफ्टमधून एकत्र जातानाच व्हिडीओ समोर आला. त्याचबरोबर भाजापाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील ठाकरेंची भेट घेत त्यांना चाॅकलेट दिलं. त्यामुळे या भेटीवर रंगलेल्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे.