अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटला, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. अर्थसंकल्पाच्या जाहिराती आधीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर ही श्रेयवादाची लढाई आहे. अजित पवारांना श्रेय मिळू नये म्हणून आधीच जाहिरातीच्या माध्यमातून कोणत्या घटकांना काय सुविधा देणार याची प्रसिद्धी करण्यात आल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.