जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३९वा पालखी सोहळा आज मोठ्या भक्ती-भावात आणि उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आज सकाळपासूनच वारकरी आणि भाविकांनी देहू नगरी फुलून गेली आरे. इंद्रायणी काठी वारकरी स्नान करून तुकोबांच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत लागले आहेत. या प्रस्थान सोहळ्याबद्दल अधिकची माहिती देहू संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.