अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याच योजनेवरून आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली. पण गेले चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.