अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरत आहेत. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी आंदोलन केलं. त्यांच्या हातात उद्धव ठाकरेंसह आघाडीच्या नेत्यांच्या फोटोचं पोस्टर होतं. एक खुर्ची बारा भानगडी अशी घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर पलटवार केला आहे.