देशासह राज्यात सध्या नीटच्या परीक्षेतील गोंधळावरून गदारोळ सुरू आहे. हा मुद्दा आज विधानसभेतही चर्चेत आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला जाब विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.