शुक्रवारी अजित पवार यांनी राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ या नव्या योजनेची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत अधिकची माहिती दिली.