राज्य विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू झालं आहे. शुक्रवारी (२८ जून) राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटला अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.