भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल टी- 20 विश्वचषकाची फायनल मॅच झाली.ही मॅच भारताने जिंकत 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी- 20 विश्वचषकावर कोरलं,त्या विजयानंतर देशभरातील क्रिडाप्रेमींनी एकच जल्लोष केल्याच पाहण्यास मिळाल,असाच जल्लोष पुण्यातील डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौक ते गुडलक हजारोंच्या संख्येने तरुणाई एकत्रित हातामध्ये तिरंगा घेऊन, फटाके फोडून जल्लोष केला.तर काही तरुण थेट बसवर चढून जल्लोष करीत घोषणाबाजी देखील केली.