विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत पुणे पोर्श अपघात, ड्रग्ज प्रकरण, नीट परीक्षेतील गोंधळ यादी विषयांवरून विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. त्याचबरोबर राज्याचा अर्थसंकल्प २८ जून रोजी सादर करण्यात आला. यामध्ये लाडली बहीण, तीर्थदर्शन, अन्नपूर्णा आदी नवीन घोषणा करण्यात आल्या. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज चौथ्या दिवशी कोणत्या विषयावरून सभागृहात गदारोळ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.