लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेल्याची घटना रविवारी (३० जून) घडली. एकाच कुटुंबातील हे पाचजण असल्याची माहिती समोर आली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील धबधब्यामधून हे पर्यटक थेट भुशी धरणात वाहून गेले. यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. नौदल पथकाकडून अद्याप शोधकार्य सुरू आहे.