१८व्या लोकसभेचं संसदीय अधिवेशन २४ जून पासून सुरू झालं आहे. आज संसदीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे.
पहिल्या पाच दिवसांत नवनिर्वाचित खासदारांच्या शपविधीसह, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतीचं अभिभाषण आदी घडामोडी घडल्या. या दरम्यान इंडिया आघाडीतील नेत्यांनी संविधानाच्या प्रती हातात घेत आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारला जाबही विचारला. त्यामुळे संसदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.