देशासह राज्यात परीक्षेदरम्यान घडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. पेपर फुटीचा हा विषय राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेत आहे. आज विधानसभेत त्यावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गतवर्षी कोणत्या विभागात पेपर फुटी झाली हे वाचून दाखलंव. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्ह म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.