शनिवार २९ जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील जीप चालकाच्या शर्टमधून साप निघाला. ताडोबाच्या कोलारा गेट परिसरातील ही घटना आहे. जीप चालक प्रमोद गायधने हे शनिवारी (२९ जून) सकाळी सफारीसाठी तयारी करत होते. तयारी करताना शर्ट घातल्यावर त्यांना शर्टाच्या आत काहीतरी वळवळ जाणवली. तेव्हा शर्टमध्ये पाहिलं असता तिथे मोठा साप त्यांना दिसला.