आज (१ जुलै) निवडुंगा विठोबा मंदिर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळ्यातील ही परंपरा आजही कायम आहे. जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असते. यानिमित्ताने मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाध्ये यांनी लोकसत्ताशी साधलेला हा संवाद पाहा.