राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधान परिषदेतही पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. या मुद्द्यावरून बोलत असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून शिवीगाळ झाली. त्यानंतर प्रसाद लाड आणि दरेकरही आक्रमक झाले.