राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत आज (१ जुलै) चर्चा चालू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी राहुल गांधींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे.