राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेतही गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आक्रमक झाले असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी देखील आगपाखड केली. यावेळी शिवीगाळ देखील करण्यात आली. हे प्रकरण तापलं असून त्यावर आता प्रविण दरेकर यांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर अंबादास दानवे यांनीदेखील झालेल्या प्रकारावर आपली भूमिका मांडली आहे.