खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील भाजापा नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे आज (२ जुलै) भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी माफी मागा असं फलक हातात घेत आंदोलन केलं. तर दुसरीकरडे काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.