खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेतही पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणानंतर प्रसाद लाड आणि दरेकर यांनी दानवेंचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आज विधान परिषदेत यावर होणार काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.