महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. सोमवारी (१ जुलै) परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार असं आश्वासित केलं. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावरून सध्या वातावरण तापलं आहे. त्याचे पडसाद विधानसभा आणि विधानपरिषदेतही उमटलेले पाहायला मिळाले.