Maharashtra Vidhan Parishad: विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेतही पाहायला मिळाले होते. भाजपाचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ करण्यात आली होती. या मुद्द्यावरून भाजपाने मंगळवारी (२ जुलै) आंदोलनही केलं होतं.