आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आहे. आपल्याला हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, असं विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं होतं.
तसंच वट सावित्रीच्या पुजेला नटयांनी आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी देखील जाऊ नये, असं वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानांनंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कसबा पेठेतील फडके हौद चौकात आंदोलन केलं. संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात, यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.