महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. अर्थसंकल्पातील विविध योजनांवरून विरोधक सध्या सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अनेक संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या पात्रता निकषांबद्दल पुन्हा एकदा सभागृहात माहिती दिली.