भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर काल (४ जुलै) मुंबईत त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर आज विधानभवनात भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात यासंदर्भातील घोषणा केली होती.