टीम इंडियाची विजयी मिरवणूक काल (४ जुलै) मरीन ड्राईव्ह परिसरात काढण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी याठिकाणी गर्दी केली होती. ही गर्दी रोखताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली होती. या मिरवणुकीनंतर आता परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.