विधान परिषेदतील शिवीगाळ प्रकरणामुळे गेले तीन-चार दिवस अधिवेशनातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनं करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांना निलंबनातून सूट देण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.