कोकण किनारपट्टीवर पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी तुरळक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाच्या प्रमुख मेधा खोले यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्हय़ातील पश्चिम भागातील घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.