अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. राजकीय मुद्दा असो किंवा राष्ट्रीय, अजित पवारांची विधानं चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणारं भाषण केलं. या भाषणात त्यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाच. पण त्याचवेळी टोलेबाजी आणि शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय चिमटे काढायलाही ते विसरले नाहीत.