मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना 11 कोटी देण्याची घोषणा केली. या घोषणेवर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती. क्रिकेटर देशासाठी खेळतात पैशांसाठी नाही. मग त्यांना पैसे का द्यायचे?”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.