विधान भवनात काल (5 जून) भारतीय क्रिकेट संघाचा सरकारकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सरकारकडून काही पोस्टर्स लावण्यात आले. या पोस्टर्सवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो होते. या पोस्टरची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. आदित्य ठाकरे यांनी या पोस्टरवरुन सरकारवर टीका केली आहे.