केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्ट्साचा वापर पेपर प्लेट्स तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “केईएम रुग्णालयाला 100 वर्ष होतील. हे एवढं जुनं रुग्णालय आहे. या रुग्णालयातील एक गंभीर बाब समोर आली आहे. केईएममधील रुग्णांच्या रिपोर्टचा वापर पेपर प्लेटसाठी करण्यात आला आहे. रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्टमधून पेपर प्लेटच्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे. डीन यांनी सांगितलं की सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.”