‘ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.यावेळी हजारो संख्येने वैष्णवजनांनी गर्दी केली होती. नीरा येथे विसावा घेऊन शाही स्नानानंतर मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे स्वागत झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता. यावेळी निरा नदी काठच्या दत्त मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही वारकऱ्यांशी संवाद साधला