काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेटपटूंना 11 कोटी देण्याची घोषणा केली. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “क्रिकेटपटूंचा आदर केला पाहिजे आणि त्यांचा निश्चितपणे मला अभिमान आहे. क्रिकेटपटूंना ऑलरेडी प्रचंड प्रमाणात बीसीसीआय बक्षीस देतं असतात त्यामुळे सरकारने त्यांना दिलेले 11 कोटी रुपये देण्यानं त्यांना फार काही फरक पडणार नाही.” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.