शरद पवार रविवारी (७ जुलै) साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवारांनी काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो, असं आवाहनही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.