मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील काही ठिकाणावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अशातच आता या पावसामुळे आमदार आणि मंत्र्यांवर पायी प्रवास करण्याची वेळ आली आहे. मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांचा रेल्वे ट्रॅक वरून विधानभवनात जाण्यासाठी पायी प्रवास केला आहे.