एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरांमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. डोंबिवली पूर्वेकडील रीजन्सी अनंतम या मोठ्या गृह संकुलात देखील पाणीटंचाईने रहिवासी हैराण झालेत. या गृह संकुलात जवळपास 4000 नागरिक राहत आहेत त्यातील जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले पाण्या संबंधात चा विचारण्यासाठी विकासाच्या कार्यालयात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला मात्र बाउन्सरने त्यांची वाट अडवली यावेळी काही प्रमाणात धक्काबुक्की सुद्धा झाली.