मुंबई मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने पालिक प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा बोट ठेवलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.