लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही शिवरायांचीच आहेत, असं सांगून महाराष्ट्र शासन ही वाघनखं आपल्याकडे आणणार आहे. मात्र ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं पत्र आपल्याकडे आहे, असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.