सोमवारी (८ जुलै) पहिल्याच मोठ्या पावसात मुंबई तुंबल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळलं होतं. यावरून विरोधकांनी सरकार आणि पालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत टीकास्त्र डागलं. पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन लक्षात घेता सभागृहाचं कामकाजही तहकूब करण्यात आलं होतं. आज दहाव्या दिवशी पुन्हा या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे.