उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षातील काही नेत्यांसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सिद्धिविनायकाच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीने फोडल्याची चर्चा आहे.