मुंबईतल्या वरळी भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरुन गेली. या घटनेमध्ये कावेरी नाखवा नावाच्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा आणि त्यांची मुलगी अमृता नाखवा यांनी आता या प्रकरणी न्याय मागितला आहे.