मुंबईमधील वरळी येथे रविवारी पहाटे मिहीर शाह या तरुणाने भरधाव कार चालवत दोघांना धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. अशातच या प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नाखवा कुटुंब करत आहेत. अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारवर आणि मराठी सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे.