मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने सर्वपक्षीय बैठक मंगळवारी (९ जुलै) बोलावली होती. मात्र या बैठकीला मविआचे नेते गैरहजर होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ नेत्यांना सुनावलं. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस असून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असण्याची शक्यता आहे.