मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने मंगळवारी (९ जुलै) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला मविआतील नेत्यांनी दांडी मारल्याने सत्ताधारी पक्षातील नेते चांगलेच संतापले आहेत. हा विषय आज विधानसभेतही चर्चे आल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना घेरलं.